मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीची २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त **'सेवा संकल्प अभियान'** प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक तालुका स्तरावर विशेष 'सेवा सेतू' शिबिरांचे आयोजन करून प्रलंबित फेरफार, सातबारा अद्ययावत करणे, स्वामित्व सनद वाटप, आधार व इतर २२ प्रकारच्या महत्त्वाच्या शासकीय सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
| अ.क्र. | सेवा | तपशील |
|---|---|---|
| १ | फेरफार प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे | महसूल अभिलेख अद्ययावत करणे व फेरफार मंजुरी. |
| २ | असाइनमेंट / सातबारा अद्ययावत करणे | गावाच्या सातबारा उताऱ्यावरील फेरफार व दुरुस्त्या पूर्ण करणे. |
| ३ | स्वामित्व सनद (Property Card) वाटप | गावठाण भूमापन अंतर्गत मालकी हक्क सनद वितरण. |
| ४ | आधार नोंदणी व अद्ययावत सेवा | नवीन आधार नोंदणी, मोबाईल नंबर व पत्ता बदल. |
| ५ | उत्पन्नाचा दाखला | शासकीय योजना व विद्यार्थी लाभासाठी आवश्यक दाखला. |
| ६ | रहिवासी दाखला (Domicile Certificate) | अधिवास प्रमाणपत्र वितरण. |
| ७ | जात प्रमाणपत्र (Caste Certificate) | मागासवर्गीय व इतर प्रवर्गासाठी जातीचे प्रमाणपत्र. |
| ८ | नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र | वैधता व आरक्षणाकरिता प्रमाणपत्र. |
| ९ | ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र | ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलती व फायद्याचे कार्ड. |
| १० | दिव्यांग ओळखपत्र व लाभ | दिव्यांग कल्याणकारी योजना व प्रमाणपत्र सेवा. |
| ११ | राशन कार्ड (शिधापत्रिका) सेवा | नवीन नाव समाविष्ट करणे, नावे कमी करणे किंवा दुरुस्ती. |
| १२ | प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना (PM-Kisan) | केवायसी (e-KYC) व बँक खाते आधार सीडिंग तपासणी. |
| १३ | शेतकरी अपघात विमा योजना | पात्र शेतकऱ्यांच्या अपघाती दाव्यांचे अर्ज स्वीकारणे व प्रक्रियेत मदत. |
| १४ | भूमि अभिलेख नकाशे व मोजणी अर्ज | जमीन मोजणी अर्ज स्वीकारणे व जुने नकाशे उपलब्ध करणे. |
| १५ | सामायिक पाणीपट्टी व वीज बिल सवलत मार्गदर्शन | शेती वीज जोडणी व पाणीपुरवठा विषयक मार्गदर्शन. |
| १६ | विविध पेन्शन योजना (श्रावण बाळ/संजय गांधी) | निराधार व वृद्ध पेन्शन योजनांचे नवीन प्रस्ताव स्वीकारणे. |
| १७ | विवाह नोंदणी प्रमाणपत्र | विहित नमुन्यातील वैवाहिक नोंदणी व प्रमाणपत्र. |
| १८ | जन्म आणि मृत्यू नोंदणी दाखले | ग्रामपंचायत व नगरपरिषद स्तरावरील अद्ययावत दाखले. |
| १९ | रोजगार व स्वयंरोजगार नोंदणी | सुशिक्षित बेरोजगार तरुणांची शासकीय पोर्टलवर नोंदणी. |
| २० | श्रम कार्ड (e-Shram Card) नोंदणी | असंघटित कामगारांसाठी राष्ट्रीय डेटाबेस नोंदणी. |
| २१ | अन्न धान्य पुरवठा व तक्रार निवारण | स्वस्त धान्य दुकानांसंबंधीच्या तक्रारी व सेवा. |
| २२ | सामान्य अर्ज व तक्रार निवारण कक्ष | नागरिकांच्या वैयक्तिक व सार्वजनिक अर्जांचे तत्काळ स्विकृतीकरण. |
कुडाळ उपविभागात प्रलंबित असलेली महसुली प्रकरणे, वाद व प्रकरणे गतीने मार्गी लावण्यासाठी 'महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत अभियान' आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय (कुडाळ/मालवण) आणि सर्व मंडळ अधिकारी कार्यालयांतील अपिले, चालू दावे तसेच फेरफार नोंदींवर सुनावणी घेतली जाईल.
| अ.क्र. | स्थळ | दिनांक व वेळ | होणारे कामकाज |
|---|---|---|---|
| १ |
उपविभागीय अधिकारी कार्यालय कुडाळ तहसीलदार कार्यालय कुडाळ सर्व मंडळ अधिकारी कार्यालये, ता. कुडाळ |
३०-०९-२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता |
संबंधित कार्यालयात चालू असलेले दावे/हरकती/अपील प्रकरणे यांचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी त्या-त्या कार्यालयात महसूल लोकअदालत घेतली जाईल. |
| २ |
तहसीलदार कार्यालय मालवण (उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचकडील मालवण तालुक्यातील अपील/दावे) सर्व मंडळ अधिकारी कार्यालये, ता. मालवण |
०१-१०-२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता |
संबंधित कार्यालयात चालू असलेले दावे/हरकती/अपील प्रकरणे यांचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी त्या-त्या कार्यालयात महसूल लोकअदालत घेतली जाईल. |
तरी कुडाळ उपविभागातील सर्व संबंधित हितसंबंधित / पक्षकार, अर्जदार व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपल्या प्रलंबित महसुली प्रकरणांच्या तडजोडीने निपटारा करण्यासाठी विहित कालावधीत संपर्क साधून या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.







