आमच्याविषयी
महाराष्ट्र राज्य नागरी सेवेतील प्रांत अधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी हे राजपत्रित दर्जाचे वर्ग (१) म्हणजे गट "अ" मधील सर्वोच्च पद आहे. उपविभागीय अधिकारी हे जिल्हाधिकारी (भा.प्र.से.) यांना जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सांभाळण्यासाठी मदत करतात.
उपविभागीय अधिकारी यांची कार्ये
- राज्य महसूल विभागाच्या उपजिल्हा/उपविभाग स्तरावर अधिकारी म्हणून काम करणे.
- उपविभागीय दंडाधिकारी म्हणून कामकाज पाहणे.
- उपविभागीय निवडणूक अधिकारी म्हणून निवडणुकीचे कामकाज पाहणे.
- उपविभागातील एखाद्या प्रशासकीय धार्मिक ट्रस्टचे (सचिव) म्हणून कामकाज पाहणे.
कुडाळ उपविभाग
- कुडाळ उपविभागांतर्गत तालुका कुडाळ व तालुका मालवण विषयी कार्यवाही करण्यात येते.
- २०१३ पूर्वी हे कुडाळ तालुका सावंतवाडी उपविभागामध्ये तर मालवण तालुका कणकवली उपविभागात येत असे.
- २०१३ साली कुडाळ उपविभाग स्वतंत्र अस्तित्वात आला.
- कुडाळमध्ये एकूण १२५ महसुली गावे आहेत. एकूण १० मंडळ आणि ५९ सझा आहेत.
- मालवणमध्ये एकूण १२४ महसुली गावे आहेत. एकूण ९ मंडळ आणि ५२ सझा आहेत.